Sunday, May 7, 2017

Maharashtra Day Special महाराष्ट्र दिन विशेष



महाराष्ट्र दिन विशेष  / Maharashtra Day Special 
आपण  इतके नकारात्मक का?
आज महाराष्ट्र दिन . मला अनेक वर्ष हा ब्लॉग लिहिण्याची इचछा होती . पण वेळे अभावी लिहू शकलो नाही.
शीर्षक एक प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला ?
तुम्ही आपलया राह्यास मागे का समझता . मी नाही समझत . त्याचे कारण हे असे की इतर राज्यात देशात राहिलो आणि ज्या प्रकारची व्यवस्था शासन लोक वागणूक पाहिल्या नंतर महाराष्ट्र हा का त्यातल्या त्यात बरा ह्याची मी उदाहरणे देऊ शकतो.
अनुभव .
जर्मनीच्या मुंबईच्या दूतावासात.  डिग्री नौकरीच्या इतर कागद पुरावे तपासण्याच्या वेळीस . हो तुम्ही कुठे अमुक कंपनी , तुमची डिग्री मुंबई पुणे विद्यापीठाची ठीक आहे जा तुमचा व्हिसा मंजूर .
आता तिथे देशा च्या विभिन्न कोपर्याण वरून लोक. त्यांना ज्या पद्धतीने विचारलेले प्रश्न त्यांचा इतका खोल तपास पाहिल्या नंतर मला त्या वर एका मराठी बंधू ने प्रतिक्रिया दिली .
आपल्या लोकांची औकात आहे का जहाजाच्या मागून परदेशात जाण्याची ?  का आपली लोक काय जाऊन तिथे युरोपिअन बाई शी विवाह करून  तिथले स्थायी नागरिकत्व मिळवतील? असले जीव घातक धंदे करणे आपल्या लोकांना धाडस नाही.
आता मला सांगा इंग्रजीत कोमोन सेन्स common sense  म्हणतो आपण याला. बेकायदेशीर मार्गा ने परदेशात जाऊन ढाबा काढण्यास धाडस जरी असला पण ह्यात तारीफ आणि गर्व करण्या सारखे काय?
महाराष्ट्रातला माणूस भारतीय सेने मध्ये जातो सेने मध्ये स्वतःचा जीव देशा साठी देतो हे काय प्राण घातक नाही? देहसाच्या सुरक्षे साठी प्राण घातक कार्य कारण श्रेष्ठ की नंबरच्या मार्गाने स्वतःच्या स्वार्थासाठी जीव धोक्यात घालणे  ?
उगीच म्हणणं की महाराष्ट्रातल्या लोकांची औकात नाही हे चुकीचे नाही.?
अनुभव
मी गुजरात मध्ये शिकायला होतो. तिथे बडोद्यात महाराज  सयाजीराव गाईकवाड विद्यापीठ आहे . आता  गायकवाड़ हे मुलाचे कुठले ?  महाराष्ट्रातले विद्यापीठ कोणी स्थापित केलेले? मराठी माणसाने शिकत आहेत देशभरातील जग भारतातील विद्यार्थी ?
कोण म्हणताय आपली औकात नाहीत.?
अनुभव .
मी हैद्राबादात होतो वर्षे . तिथे मराठी मंडळ सगळं होते तिथे कोठी भागात अनेक मराठी व्यवसाय , शैक्षणिक संस्थाने पाहिली . राज्य ( त्याकाळी आंध्र प्रदेश आत्ताचे तेलंगणा )  मग आता कुठे गेली औकात?
अनुभव
मला एका परप्रांतीयाने सांगितले तुमच्या महाराष्ट्रातल्या लग्नांना काही मजाच नाही . मी म्हटलो म्हणजे काय. ?  म्हणजे नाच गाणे नाही हुंडा नाही रुखवतात इतक्याश्याच गोष्टी .
मला सांगा ढगाळ धिंगाणा रस्त्याचा कोंडाळा ह्यात मजा आहे? लग्ना आहे पैश्याची उधळपट्टीची किंमत भरतय  कोण? आणि सांगणारी हि कोण. म्हणजे आम्हाला लग्न  म्हणून आमची पद्धत नाही?
अनुभव ४अजून एका पॅरा प्राणतीय विदूषक मला एकदा म्हणाला  तुमच्या राज्यात जेवण भलतेच महाग? मी म्हटले तू काय घेतोस त्याच्यावर अवलंबून आहे. मी जर का तुझ्या राज्यात मला काय भाकरी आणि पिठले , पुराणाच्या पोळ्या  इथे मिळणाऱ्या किमतीत मिळेल का?

मला आपल्या महाराष्ट्रातील थोर व्यक्तींची नावे सांगायची आवश्यकता नाहीच. ती तुम्हाला माहित असतीलच.
पहिले हलते चित्र , पहिली महिला वैद्य , सामाजिक कार्यकारते महाराष्ट्रातलेच. आपल्याच राज्याला किती नकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची आपली परंपरा आता सोडण्याची आवश्यकता आहे.
आणि दृष्टिकोन हे आधी स्वतः च्या घरात येण्याची आवश्यकता आहे. म्हणजे स्वतःच्या राज्यातल्या इतर भागांच्या संस्कृती वेशभूषा खाद्य ह्याच्यावर पु ला प्रमाणे टीका करणे सोडणे.
म्हणजे कोकणात विधार्भीय मराठवाड्याचे पदार्थांचे हाटेल ,विदर्भात कोल्हापुरी मिसळ पाहोचणे.
जर्मनी फ्रांस येथे मी पिढ्या राहणाऱ्या मराठी बांधवाना जेव्हा पाहतो आश्चर्य वाटते. इतके वर्ष  युरोपीय संस्कृतीत मिसळयावर पण मराठी मुलाबद्दल कदाचित महाराष्ट्रातल्याअ माणसा पेक्षा अधिक ओढ मला आढळली.

मी फ्रांसच्या दक्षिणी तटावर निस नावाचे गावी गेलो. तिथे अगदी आपल्या गिरगावा सारखी घर , निस वरून मोनॅको देशात रेल्वे ने प्रवास केला तेव्हा कोकणातून प्रवास करत आहे असे वाटले . तेथील घरे देखील आपल्या पुण्यातील किंवा कोकणातील वाद्यां सारखी . त्यांचे वाडे पाहून तुम्ही इतके आकर्षित ,आश्चर्यचकित होता  सांगायचे तात्पर्य हे कि आपल्याला आपल्याबद्दल न्यूनगंड का?  .
त्यांची सांस्कृती ते जपतात आपली का नाही?
आपल्या संस्कृतीत लाजिरवाणे काय?
पालक पनीर आणि तंदूर  चिकन आणि भांगरा नाच हेच केवळ भारताची ओळख नाही.
दांडिया सारखा भोंडला , गोंधळ , लेजीम अशे महाराष्ट्रातलेही नृत्य आहेत .
पालक पनीर , तंदूर चिकन  सारखे बोंबील तळलेले, मालवणी चिकन   झुणका भाकर , गोळा भात  अशी अनेक स्वादिष्ट पदार्थ आहेत.
हेच मला जाणवले की इतका विशाल प्रदेश जिथे एका टोका पासून , दुसर्या टोका पर्यंत एकाच भाषेची बदलती भाषेची बोली , संस्कृती , भोजन हे खुद्द महाराष्ट्रातल्याच नागरिकांना ठाऊक नसेलच. तर जागा कडून काय अपेक्षा करता.
ताज महालाच्या जोडीला शनिवार वाडा , रायगड, शिवनेरी, शाहू महाराज वाद आहेत.
अनेक मराठी भाषिक देखील जेव्हा भारता बद्दल  ओळख करताना भागवायची ठिकाणे मध्ये ताज महाल गोव्या बद्दल सांगतात . मला सांगा
का लाज वाटते तुमच्या स्वतःच्या राज्याचा सुवर्ण इतिहास सांगायचा?
का तुम्हाला कोकणचा सुंदर किनाऱ्याचा उल्लेख करता येत नाही. का तुम्हाला शिवनेरी किल्ला , पन्हाळगड, रायगड किंवा ताडोबा , मेळघाटबद्दल सांगण्यास संकोच होतो? 
हा न्यूनगंड  सोडा आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महाराची ओळख हि पॅरा प्रांतात , पॅरराष्ट्रात करा पण सामर्थ्याने. सामार्थाने चा अर्थ कुठलाही अनुचित प्रकार केल्या शिवाय. आज महाराष्ट्रातील सुशिक्षित , विद्यार्थी वर्ग जेव्हा परदेशात जातो तेव्हा बरेच कमी प्रश्न विचारले जातात . त्याच सामर्थ्याने कोणाचा विश्वासघात केल्या शिवाय महाराष्ट्राचे नाव वर करा.
जय हिंद  जय महाराष्ट्र